भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गया । धन्य मही माया ब्रह्मा ह्मणे

dhanya tya gopika dhanya tyanchya gaya | dhanya mahi maya brahma hmane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गया । धन्य मही माया ब्रह्मा ह्मणे ॥१॥ विश्वात्मा जो हरी क्रीडे या वनांत । तृणादि समस्त धन्य धन्य ॥२॥ धन्य गोवर्धन धन्य वृंदावन । वृक्षादि पाषाण धन्य धन्य ॥३॥ धन्य हें गोकूळ धन्य हे गोपाळ । व्रजवासी सकाळ धन्य धन्य ॥४॥ धन्य ही यथोदा स्तन दे मुकुंदा । धन्य तूंची नंदा त्रैलोक्यांत ॥५॥ ब्रह्मसनातन वेदासी नकळे । तें गडयां-सवें खेळे अरण्यांत ॥६॥ विश्वाचा जो बाप नंद त्याचा पिता । यथोदेसी माता म्हणतसे ॥७॥ सद्नदित कंठ नेत्रीं जळ वाहे । नामा ह्मणे काय मागतसे ॥८॥