भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य पंढरीचे सकळही जन । जिहीं सख्य केलें जाण विठठलपायीं

dhanya pandhariche sakalahi jan | jihin sakhya kelen jan vithathalapayin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य पंढरीचे सकळही जन । जिहीं सख्य केलें जाण विठठलपायीं ॥१॥ विठठल ह ध्यानीं विठठल हा मनीं । विठठल चिंतनीं रात्रंदिवस ॥२॥ विठ्ठलविण जया नगमे एक घडी । सर्वस्वें आ-वडी विठठलाची ॥३॥ विठठलची माता विठठलचि पिता । भगिनी आणि भ्राता विठठल ज्यांचा ॥४॥ विठठलचि मित्र विठठलचि पुत्र । विठठल कुळगोत्र केला जिहीं ॥५॥ विठठलचि क्रिया विठठलचि कर्म । विठठल सकळ धर्म कुळदैवत ॥६॥ गुज गौप्य जीवींचें विठठला सां-गावें । विठठलें पुरवावें कोड त्यांचें ॥७॥ सर्वकाळ करणें विठठलचि कथा । विठठल जडला चित्त जयाचिया ॥८॥ विठठल जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्तीं । अखंड बोथरती विठठल विठठल ॥९॥ ऐसा सर्वस्वेंसी विठठल भजतां । सुख आलें हातां विठठलाचें ॥१०॥ नामा म्हणे त्याचें चरणरेणु होऊन । झालों मी पावन ह्मणे आतां ॥११॥