भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ही यमुना धन्य हें गोकुळ । वृक्षादि सकळ धन्य धन्य

dhanya hi yamuna dhanya hen gokul | vrukshadi sakal dhanya dhanya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य ही यमुना धन्य हें गोकुळ । वृक्षादि सकळ धन्य धन्य ॥१॥ धन्य ह्या गोपिका धन्य हे गोपाळ । पक्षादि सकळ धन्य धन्य ॥२॥ धन्य गोवर्धन धन्य वृंदावन । नंदाचा मंदन क्रीडतसे ॥३॥ धन्य ती यशोदा धन्य तिचा पति । अखंड पाहाती मुख ज्याचें ॥४॥ माया घेवोनियां देव गेला राना । ध्वजवज्रांकुश चिन्हां उमटती ॥५॥ नेत्रीं अश्रुपात उतरे रथाखाले । गडबडोनी लोळे तयावरी ॥६॥ ब्रह्मादिकां दुर्लभ येथील ही माती । घेवोनियां हातीं मुखीं घाली ॥७॥ नामा ह्मणे पुढें चालिला त्वरित । देखे गडियांत परब्रह्म ॥८॥