भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवराज आले मंचकीं बैसले । भक्तांसि दिधलें अभय-दान

devaraj ale manchakin baisale | bhaktansi didhalen abhay-dan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवराज आले मंचकीं बैसले । भक्तांसि दिधलें अभय-दान ॥१॥ दासहो तुह्मी सकळ सुखी रहा । सुखी राहोनियां आनंद करा ॥२॥ रात्रंदिवस माझें करारे चिंतन । यमाचें बंधन नाहीं तुह्मां ॥३॥ विष्णुदास नामा गाऊनियां गेला । शेजे पहुडला देवराणा ॥४॥