भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवकी कवण वसुदेव कवण । सांगवी हे खूण नाग-वळा

devaki kavan vasudev kavan | sangavi he khun nag-vala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवकी कवण वसुदेव कवण । सांगवी हे खूण नाग-वळा ॥१॥ ऐकोनी उत्तर देव मनीं पाही । बोलतो लवलाही चित्त देईं ॥२॥ सुतपा प्रती ते अनुष्ठानी दोघे । करूनियां तपें वर मागे ॥३॥ तया दिल्हा वर पुत्र मी होईन । यालागीं कारण आहे तेथें ॥४॥ तींचि दोघें झाली वसुदेव देवकी । ह्मणोनी यादवीं जन्म घेणें ॥५॥ तयाचा वृत्तांत आतां कोठें आहे । सांगेन लवलाहें नामा म्हणे ॥६॥