भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें

dev rukmabai anik sadhujan | kariti samadhan nivrutichen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें ॥१॥ ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती । अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥ धन्य तुमचा महिमा बोलती पुराणीं । दृश्य कांहीं मनीं आठवूं नये ॥३॥ आकाशाचे ठायीं अभ्रें येती जाती । कोण त्याची खंती करुं पाहे ॥४॥ अवतारादिक गेले आले अपार । जैसा का विस्तार मृगजळाचा ॥५॥ नामा म्हणे देवें धरियेलें हातीं । उठविली विभूति निवृत्तिराज ॥६॥