भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी

dev kshirabdhisi alo ho sakal | karuni nishchal manamaji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी ॥१॥ प्राणायाम मुद्रा लावूनि अंतरीं । इंद्रादि श्रीहरि चिंतूनियां ॥२॥ विराट जें पाहीं संस्कृतें वर्णियेलें । तेंचि चिंति-येलें नामा म्हणे ॥३॥