भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव कळवळले चित्तीं । त्यासी मायेची संमती

dev kalavalale chittin | tyasi mayechi sammati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव कळवळले चित्तीं । त्यासी मायेची संमती ॥१॥ मायबापांचा त्या लळा । नामा घेईना कां आळा ॥२॥ बाप जगताचा स्वामी । आई प्रत्यक्ष लक्षुमी ॥३॥ नामा थोराचें लेंकरूं । छंड त्याचा अनिवारु ॥४॥ छंद नाम्याचा पुरविण्या । देव वेंची प्रेमनाण्या ॥५॥ हाटीं उदमीं भाविक । विठुराजा त्या ग्राहिक ॥६॥