भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव दयानिधि भक्तांचा कैवारी । नाममात्रें तारी सर्वांलागीं

dev dayanidhi bhaktancha kaivari | namamatren tari sarvanlagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव दयानिधि भक्तांचा कैवारी । नाममात्रें तारी सर्वांलागीं ॥१॥ तया देवराया गावें हो आवडी । लागे मनीं गोडी सर्वकाळ ॥२॥ नाहीं यातिकूळ उंच नीच भेद । भाव एक एक शुद्ध पाहातसे ॥३॥ नामा म्हणे काय सांगावें नवल । अखंड दंडलें व्योमाकार ॥४॥