भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा

dev dagadacha bhakta ha mavecha | sandeh doghancha phite kaisa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥