भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊनि भातुकें गळां घाली मिठी । सखा जगजेठी भक्ती भावा

deuni bhatuken galan ghali mithi | sakha jagajethi bhakti bhava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देऊनि भातुकें गळां घाली मिठी । सखा जगजेठी भक्ती भावा ॥१॥ आधार करोनि राहिले पंढरीं । तेथें निरंतरीं प्रेम दावी ॥२॥ नामा ह्मणे सेवा करोनियां शुद्ध । संसार संबंध नाहीं तया ॥३॥