भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखुनी पंढरीच्य सुखा । मोक्षपद आलें फुका

dekhuni pandharichya sukha | mokshapad alen phuka

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देखुनी पंढरीच्य सुखा । मोक्षपद आलें फुका ॥१॥ अवघें विठ्ठलचि झालें । येणें पुंडलिकें केलें ॥२॥ ऋद्धि सिद्धि पंढरपुरीं । होवोनी वोळती कामारी ॥३॥ मुक्ति वागती अंगणीं । घरोघरीं वाहे पाणी ॥४॥ तीर्थ चिंतवणी करिती । पुढें आमुची कोण गती ॥५॥ आला कळिकाळा त्रासू । विठा म्हणे विष्णुदासू ॥६॥