भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखती तीं दोन्ही पाडसें त्या काळीं । भिल्लापुढें आली लागवेगें

dekhati tin donhi padasen tya kalin | bhillapudhen ali lagavegen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देखती तीं दोन्ही पाडसें त्या काळीं । भिल्लापुढें आली लागवेगें ॥१॥ सांभाळोनि हात ऐकावी विनंती । धरीं कृपा चित्तीं आमुचिया ॥२॥ अतितालागोनि चिलिया वोपी देहे । तेणेंचि तो लाहे परमधाम ॥३॥ मातापितरांसी न करावा घात । मारावें आमुतें आधी आतां ॥४॥ कोंवळें शरीर गोड बहु मांस । लागो सार्थ-कास तुझे कांजी ॥५॥ नामा म्हणे सत्त्व मोठें त्या पांचांचें । होती कैलासींचे अधिकारी ॥६॥