भजनी मालिका
← भजनांकडे परत

दर्दुराचें पिलूं ह्मणे रामकृष्ण । नाहीं उदक उष्ण झालें तेथें

dardurachen pilun hmane ramakrushna | nahin udak ushna jhalen tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दर्दुराचें पिलूं ह्मणे रामकृष्ण । नाहीं उदक उष्ण झालें तेथें ॥१॥ कढईमध्यें बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावे वेगीं ॥२॥ तये काळीं आज्ञा केली पावकासी । झणीं तापविसी तयालगीं ॥३॥ ऐसा तो कृपाळु आपुलिया दासा । आमुचा कोंवसा नामा ह्मणे ॥४॥