भजनी मालिका
← भजनांकडे परत

दळितां कांडितां । तुज गाईन अनंता

dalitan kanditan | tuj gain ananta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥ न विसंवें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥ नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥ मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥ लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥