भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्रभागे तीरीं आयकिल्या गोष्टी । वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला

chandrabhage tirin ayakilya goshti | valmiken shatakoti granth kela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चंद्रभागे तीरीं आयकिल्या गोष्टी । वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला ॥१॥ तेणें माझ्या चित्ता बहु जाले क्लेश । व्यर्थ म्यां आयुष्य गमाविलें ॥२॥ जाऊनि राऊळा विठोसी विनविलें । वाल्मिकानें केलें रामायण ॥३॥ असेन मी खरा तुझा भक्त देवा । सिद्धीस हा न्यावा पण माझा ॥४॥ शतकोटी तुझे करीन अभंग । म्हणे पांडुरंग ऐक नाम्या ॥५॥ तये वेळीं होती आयुष्याची वृद्धि । आतांची अवधि थोडी असे ॥६॥ नामा म्हणे जरी न होतां संपूर्ण । जिव्हा उतरीन तुज पुढें ॥७॥