भजनी मालिका
← भजनांकडे परत

चण्डभिल्ल तेणें ऐकिलें बोलणें । सावधान मनें करो-नियां

chandabhilla tenen aikilen bolanen | savadhan manen karo-niyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चण्डभिल्ल तेणें ऐकिलें बोलणें । सावधान मनें करो-नियां ॥१॥ तेव्हां होती चित्तीं वासना जे खोटी । जिरऊनि पोटीं चाकाटला ॥२॥ भीतिल यालागीं वृक्षा आड आला । ऐकों जो लागला शब्द त्यांचे ॥३॥ नामा ह्मणे ऐसा राहिला पारधी । ऐकावें ते संधि काय झालें ॥४॥