भजनी मालिका
← भजनांकडे परत

चैतन्याश्रम संन्यासी जाले गृहवासी । मुळींच्या प्रकृतीसी ऐक्य केलें

chaitanyashram sannyasi jale gruhavasi | mulinchya prakrutisi aikya kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चैतन्याश्रम संन्यासी जाले गृहवासी । मुळींच्या प्रकृतीसी ऐक्य केलें ॥१॥ हासिन्नले लोक बरवा हा संन्यास । करिती उपहास दर्शनाचा ॥२॥ द्विजीं वाळियेलें जगीं सांडियेलें । सेखीं उपेक्षिलें आप्तवर्गीं ॥३॥ ऐसीं बारा वरुर्षे क्रमिली निगुती । तंव जालीसे संतती चौघजण ॥४॥ निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई । हांसती सकळही ऐकोनि नांवें ॥५॥ जालीं उपवरें व्रतबंधा योग्य । उभयतां उद्धेग चिंतातुरें ॥६॥ जातिकुळावेगळी पडियेली निराळी । माझी वंशावळी प्रायश्चित्त ॥७॥ मेळविले द्विज केली ब्रह्मसभा । क्षमा अपराधा करा दीना ॥८॥ निबंधीं निर्णय पाहती धर्मशास्त्रीं । तुम्हीं अति श्रौती परायण ॥९॥ सांगाल तें मान्य म्हणती साहीजणें । शुची हें करणें पतितांसी ॥१०॥ निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष । दर्शनेची मोक्ष जडमूढा ॥११॥