भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मीं ब्रह्म एक मुळीं नाहीं जग । सर्व मायायोग कल्प जाणा

brahmin brahma ek mulin nahin jag | sarva mayayog kalpa jana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्रह्मीं ब्रह्म एक मुळीं नाहीं जग । सर्व मायायोग कल्प जाणा ॥१॥ स्थावर जंगम सर्व मयोपाधि । जाण पां त्रिशुद्धि आत्मज्ञामें ॥२॥ रवीच्या कीरणें जैसें मृगनीर । तैसें ब्रह्मीं कीर विश्व झालें ॥३॥ नामा ह्मणे वाचा ऐका निज खूण । स्वरूपीं तल्लिन होऊनि राहें ॥४॥