भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतीचें वचन । सर्व नारायण सर्वां-भूतीम

brahma te brahman shrutichen vachan | sarva narayan sarvan-bhutim

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतीचें वचन । सर्व नारायण सर्वां-भूतीम ॥१॥ चहूम शिक्षा जनीं गुरु चालू वर्ण । प्रत्यक्ष पुराणें साक्ष देती ॥२॥ हेळसुनी निंदी दुरावी ब्राह्मणा । सभेमाजी जाणा दुर्‍हा­-विती ॥३॥ त्याचें पाप नाहीं खंडण सर्वथा । म्हणोनि अनंता भय वाटे ॥४॥ कोपला प्रहर ब्राह्मणा मारिला । लक्ष वेडावलीं भूषण-त्या ॥५॥ क्रोध अग्नि ज्वाळा झगटती जेथें । न उरती तेथें काडि-मात्रें ॥६॥ उगेंच ब्राह्मणा सांबें छळियेलें । सर्व शांत झाले आपो-आप ॥७॥ अपेक्षिती कोण्ही तेंचि तें होतें । न बोलावे येथें बोल कांहीं ॥८॥ अग्नीसी लहान थोर न ह्मणावा । पडे परिस्वाहा सर्व कांहीं ॥९॥ मार्कंडेय बुद्धि छळूनि ब्राह्मन । आयुश्य तें उणें होय माझें ॥१०॥ ब्राह्मणाचें वीर्य मातंगीचे पोटीं । त्याचि एका गोष्टी आशिर्वाद ॥११॥ आयुष्याचे कल्प सात चौदा होती । ऐ-कोनि विश्रांति कीर्तनानें ॥१२॥ धन्य गोत वित्त स्त्रिया आणि पुत्र । सर्व व्हावें हित ब्राह्मणातें ॥१३॥ कुळक्षयो व्हावे ऐसें वाटे जीवा । ब्राह्मणासीं दावा नको बापा ॥१४॥ नामा म्हणे ऐके धन्य ते ब्राह्मण । धरिले चरण माथां त्यांचे ॥१५॥