भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलोनियां येणें वाढविला डांगोरा । अंतरींचा केरा गुरुविण

boloniyan yenen vadhavila dangora | antarincha kera guruvin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बोलोनियां येणें वाढविला डांगोरा । अंतरींचा केरा गुरुविण ॥१॥ संतांचा सन्मान कळेना जयासी । राहुनि देवापाशीं काय केलें ॥२॥ परिसा झांकण घातलें खापर । नाहींज जाले अंतर बावनकस ॥३॥ खदिरांगारीं श्रृंगारी हिलाल । अंतरींचें काळें गेलें नाहीं ॥४॥ म्हणे मुक्ताबाई अभिमानें नेलें । सर्पा पाजियेलें विष तेंचि ॥५॥