भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती । हरि पाविजे ती गति । वेगळी असे

bolavari bolati | shruti vakhaniti | hari pavije ti gati | vegali ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती । हरि पाविजे ती गति । वेगळी असे ॥१॥ तुज न पवे गा तें स्वप्न । हरिशब्द एकचि ब्रह्म । पाविजे तें वर्म । वेगळें असे ॥२॥ एक जाणीव खटपट । करिसी ते सैराट । हरि पाविजे ती वाट । वेगळी असे ॥३॥ एक आहेत तार्किक । चार्वाकादी बादक । हरि पाविजे तें सुख । वेगळें असे ॥४॥ एक चातुर्यवक्ते । व्युत्पन्न कवित्वें । संत रंजविते । लोका-चारी ॥५॥ जिहीं तुज जाणितलें । तिहीं मौन धरिलें । नामा म्हणे ते पावले । भक्तियोगें ॥६॥