भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूषक हव्यासें चालूनि भूमीतेम । मांजर तयातें टप-तसे

bhushak havyasen chaluni bhumitem | manjar tayaten tap-tase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भूषक हव्यासें चालूनि भूमीतेम । मांजर तयातें टप-तसे ॥१॥ तसा तुज काळ टपे वेळोवेळां । वेगीं त्या गोपाळा भजावें बापा ॥२॥ भानुचेनि माप आयुष्य वो सरे । अवचितां कांरे डोळा झांकी ॥३॥ नामा म्हणे अरे निश्चिती हे मूढा । हरी नाम दृढा सेवीसीना ॥४॥