भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । तैसे आचार गौरब । सुकुलिन जनाचे

bhumichen mardav | sange kombhachi lavalav | taise achar gaurab | sukulin janache

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । तैसे आचार गौरब । सुकुलिन जनाचे ॥१॥ झाड जाणावें फूलें । मानस जाणावें बोलें । भोगें जाण्याबेम केलें । जन्मांतरींचें ॥२॥ लोभ जाणावा उभय दृष्टी । क्रोध जाणाव भोवया गांठीं । लटिका जाणावा बहु गोष्टी । नष्त प्रकृति ओळखावा ॥३॥ द्वाही घातलिया जाणावा खरा । ढोकळ जाणावा कली अबसरा । परद्बारिणी जाणावी उण्या उत्तरा । कुश्चळी घरोघरीं हिंडतसे ॥४॥ मृदंग जाणावा गंभीर नांदे । गाणें जाणावें सुस्वर शब्दें । ओंकार जाणावा अक्षरभेदें । शाहाणा शब्दें ओळखावा ॥५॥ विष्णुदास नामा करी विनंती । या उत्तराची न मानाची खंती । केशवाचा प्रसाद आहे माझे चित्तीं । देवा काय करिसी तें न कळे ॥६॥