भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी

bhrataren vairagya ghetaliya vari

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी । जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥ वत्सा साठीं देह अचेतन पडे । हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥ भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी । अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥ भ्रताराचें शेष न सांपडे तरी । पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥ चित्त हें भ्रताराविण जरी जाये । तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥ भ्रतारदर्शनाविण जाय दीस । तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥ बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥