भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें । श्रवण मनन होउनी ठेलें

bhranti majhen man prapanchin guntalen | shravan manan houni thelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें । श्रवण मनन होउनी ठेलें ॥१॥ बापें बोधिलें बापें बोधिली । बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥२॥ निजध्यासें कैसा अवघाचि सांपडला । कीं विश्वरूपीं देखिलां बाईयांनो ॥३॥ नामयाची जनी स्वयंबोध झाला । अवघाचि पुसिला ठाव देखा ॥४॥