भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी

bhillanichin phalen kaishin | chakhoni vahatase devasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥ भावें तिचीं अंगिकारी । सर्वांहुनी कृपा करी ॥२॥ गुज वान्नरांसी पुसावें । राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥ बान्नर अवघे भुभु:कार । बोलताती रामासमोर ॥४॥ आज्ञा कराची आम्हांसी । रावण आणितो तुम्हापासीं ॥५॥ तुझ्या नामाच्या प्रतापें । हनुमंत गेला जी संतापें ॥६॥ सीताशुद्धि करूनी आला । दासी जनीस आनंद झाला ॥७॥