भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटसी केधवां माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा

bhetasi kedhavan majhiya jivalaga | ye ga panduranga mayabapa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भेटसी केधवां माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा ॥१॥ चित्त निरंतरीं तुझे महाद्वारीं । अखंड पंढरी ह्रदयीं वसे ॥२॥ श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥३॥ भेटिचें आरत उत्कंठित चित्त । तुजविन माझें हित कोण करी ॥४॥ कटीं कर विटे समचरण साजिरे । देखावया झुरे मन माझें ॥५॥ असुवें दाटलीं उभारोनि बाहे । नामा वाट पाहे रात्रंदिवस ॥६॥