भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे तें लक्षण भज-नाचें

bhedavadi jan vadatase bhinna | navhe ten lakshan bhaj-nachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे तें लक्षण भज-नाचें ॥१॥ विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचें कौतुक कैसें सांगा ॥२॥ ब्रह्मीं नाहीं ठाव एकपणाचाही । तेथें दुजें कांहीं समावतें ॥३॥ आदि मध्यें अंतीं खेळूनियां खेळ । उरलें तें निखळ अविनाश ॥४॥ हेमीं जैसे केले तैसे होती नग । तरी ते अव्यंग सोनेपणीं ॥५॥ केली जैसी भक्ति शैव कां वैष्णव । पाहतां तो देव नाहीं दुजा ॥६॥ शिवविष्णु दोघे एकचि अवतार । वेदांनीं निर्धार हाचि केला ॥७॥ नामा ह्मणे येथें दुजा नको भाव । विष्णु तोचि शिव शिव विष्णु ॥८॥