भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावेंचि भजन जनी जनार्दन । नित्य हें वचन रामनाम

bhavenchi bhajan jani janardan | nitya hen vachan ramanam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भावेंचि भजन जनी जनार्दन । नित्य हें वचन रामनाम ॥१॥ खुंटतील योनी तुटेल यातना । भक्ति नारायणा पावेल तुझी ॥२॥ स्मरे सदा कांरे न लगती पाल्हाळ । वसिजे गोपाळ सर्वांभूतीं ॥३॥ नामा म्हणे ब्रह्म सर्व हरि । येकु चराचरीं जनार्दन ॥४॥