भजनी मालिका
← भजनांकडे परत

भरतें त्यागिली जननी । ख्याति झाली त्रिभुवनी

bharaten tyagili janani | khyati jhali tribhuvani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भरतें त्यागिली जननी । ख्याति झाली त्रिभुवनी ॥१॥ ऐसी भक्ति तुझी हरी । जनीं करंटा न करी ॥२॥ बंधु अवज्ञा बिभिषणा । प्रगट झाला रामराणा ॥३॥ प्रर्‍हाद पितृआज्ञा न करी । स्तंभीं प्रगटला नरहरी ॥४॥ पति अवज्ञा ऋषिपत्न्यांसी । कृष्ण दर्शन पूर्ण त्यांसी ॥५॥ नाना ह्मणे भक्ता अवरोधीं पाही । त्यासी त्यजिल्या दोष नाहीं ॥६॥