भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांचें तें साह्या करणें पांडुरंगा । म्हणोनि तीर्थगंगाअ उगविलें

bhaktanchen ten sahya karanen panduranga | mhanoni tirthagangaa ugavilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तांचें तें साह्या करणें पांडुरंगा । म्हणोनि तीर्थगंगाअ उगविलें ॥१॥ जान्हवी मंदाकिनी भोगावती मिळुनी । दुजी हे त्रिवेणी या भूमीसी ॥२॥ निर्झर जीवन वाहती निरंतर । तेथें वटेश्वर उतरले ॥३॥ दुरोनि हें स्थळ दिसे मनोहर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥ नामा म्हणे स्थळ आदि हें अनादि । येथेंची समाधी सोपानासी ॥५॥