भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त अमर स्वस्तिक्षेम । चरणरजें डौरलें व्योम

bhakta amar svastikshem | charanarajen dauralen vyom

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्त अमर स्वस्तिक्षेम । चरणरजें डौरलें व्योम । मग कैलासीं मंदाकिनी सोम । नीळकंठे सिरीम धरियेली ॥१॥ धन्य विष्णुचरणींची गंगा । स्नपन होत महालिंगा । भीमरथीं मृत्युलोकीं सवेगा । इंद्रायणीसमरसें ॥२॥ भोगावती पाताळ गेली । मग विष्णुचरणीम गुप्त ठेली । मग पुरोनियां उरली । त्र्यंबक सिखरीं ॥३॥ मग कितेका काळें भागीरथी । भगीरथें आणिली भारथीं । सगर उद्धरिले त्वरितीं । विष्नुतीर्थें करुनियां ॥४॥ ऐसी त्रिभुवनीं ज्याची थोरी । तो मुकुटमणे हा हो श्रीहरी । त्यातें सोडिलिया मुक्ति चारी । काय आम्हां तारिती ॥५॥ सर्वे तीर्थे ज्याचे रंक । आम्ही तयाचे सेवक । ज्याचेनि नामें हें त्रैलोक्य । नाम घेताम तरत ॥६॥ तो पूर्ण बीजमंत्र आम्ही जाणों । विष्णुविण कांहीं नेणों । पूर्ण ब्रह्म काय म्हणों । हा महिमा तूं जाणसी ॥७॥ ज्ञानदेव्म नमस्कारिले हरी । निवृत्ति सोपान झडकरीं । मुक्ताई भेटली लवकरीं । ज्ञानदेवा करीं धरियलें ॥८॥