भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजन करा रे हरिहरा । नारायण शिवशंकरा

bhajan kara re harihara | narayan shivashankara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भजन करा रे हरिहरा । नारायण शिवशंकरा । माझें बोलणें हें अवधारा । भेद न करा दोघांचा ॥१॥ तुम्हां सांगेन सत्य वृत्तान्त । पाहें पां तेथींचा दृष्टान्त । नारायणें सेविलें अमृत । जला श्वेत महादेव ॥२॥ शंभूनें गिळिलें हलाहला । म्हणोनि विष्णु जाला निळा । देखत देख आंधळा । झणीं होसी गव्हरा ॥३॥ लक्ष्मी रुपें आपण हरु । देवें वरिला शारंगधरु । गरुडरुपें महेश्वरु । वहन जाला विष्णूचें ॥४॥ शक्तिरुपें शारंगापणि । नारायण जाला भवानी । शारंगधर नंदी होऊनि । सन्मुखासनीं बैसला ॥५॥ एक तो एक वेगळा नाहीं । दृष्टान्त तूं आगमीं पाहीं । नामा म्हणे एक केशव ध्यायीं । हरिहर पाहीं ज्याचे अवतार ॥६॥