भजनी मालिका
← भजनांकडे परत

बांधिलें राहीना वैरलें खाईना । दवडिलें जाईना जाणते हो

bandhilen rahina vairalen khaina | davadilen jaina janate ho

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बांधिलें राहीना वैरलें खाईना । दवडिलें जाईना जाणते हो ॥१॥ तय खुंटा नांदावें सौरसें बांधावें । कशानें करावें वोढाळें हो ॥२॥ तया नेत्र ना पाय तिन्ही एक पाहे । न देखावे ते ठाय देखताहे ॥३॥ नामा म्हणे श्रोता विचारावें ज्ञानीं । केश-वाचे नयनीं उतरला ॥४॥