भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें

balapanin hichi varshen gelin bara | khelatan de pora nana-maten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥ विटु दांडु चेंडु लगोर्‍या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥ सेलदोरे खेळी आणि सलवडी । उचलिती धोंडी अंगबळें ॥३॥ कोंबडा कोंबडी आणि पाणबुडी । आणि सेलडी लिंबुठिंबु ॥४॥ नामा म्हणे ऐसें गेलें बाळपण । मग आलें जाण तारुण्य तें ॥५॥