भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाई कौसल्येचा पुत्र । दिसे सर्वांही विचित्र

bai kausalyecha putra | dise sarvanhi vichitra

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाई कौसल्येचा पुत्र । दिसे सर्वांही विचित्र ॥१॥ ऐसें वाटे माझ्या चित्तीं । प्रगटली विष्णुमूर्तीं ॥२॥ झणीं होईळ या दृष्ट । मोडताती कानीं बोट ॥३॥ तिच्या भाग्यें असो सुखी । याचा म्हणे सर्वांमुखीं ॥४॥