भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां पुंण्याचे कष्ट । त्यासी प्राप्त हें वैकुंठ

bahutan punnyache kashta | tyasi prapta hen vaikunth

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बहुतां पुंण्याचे कष्ट । त्यासी प्राप्त हें वैकुंठ ॥१॥ तैसी नोहे ही पंढरी । पतित पापियातें तारी ॥२॥ बहुता तपाचें प्रत्यक्ष । त्यासी अपकारी मोक्ष ॥३॥ जेणें केलीं तप तीर्थें । तोचि आवडे मुक्तीतें ॥४॥ देह यासी नानविधि । त्यासी प्राप्त होय सिद्धी ॥५॥ विठा म्हणे नामघोष । पळ काढील महा दोष ॥६॥