भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाहूबळें तुवां काढिलें अमृत । ठेवीं बा तो हात शिरा-

bahubalen tuvan kadhilen amrut | thevin ba to hat shira-

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाहूबळें तुवां काढिलें अमृत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥१॥ जननी माझी जेव्हां ज्याकडे बाहत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥२॥ देवा बैसवोनि शुद्ध तें वाढीत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥३॥ क्षीराचा सागर उपमन्यूशी देत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥४॥ घेवोनियां चक्र परिक्षिता रक्षीत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥५॥ कवटाळूनि धरिलें ध्रुवासी वनांत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥६॥ विदुराच्या घरीं कण्या सांभाळीत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥७॥ चिरंजीव करूनियां नगरी सुवर्ण देत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥८॥ नामा म्हणे युद्धीं रक्षियेला पार्थ । ठेवीं बा तो हात शिरावरी ९