भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु दिस होतों तुमचां गांवीं । आतां कृपा असों द्यावी

bahu dis hoton tumachan ganvin | atan krupa ason dyavi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बहु दिस होतों तुमचां गांवीं । आतां कृपा असों द्यावी ॥१॥ आम्ही जातों आपुल्या गांवा । विठोबा लोभ असों द्यावा ॥२॥ आमुचे ठायीं तुझें मन । तुझें चरण आमुचे प्राण ॥३॥ आमुचें स्मरण असों द्यावें । लिखित पत्र पाठवावें ॥४॥ नामा म्हणे जी केशवा । अखंड प्रेमभाव द्यावा ॥५॥