भजनी मालिका
← भजनांकडे परत

अव्यक्त परब्रह्मा कैसें आलें वो व्यक्तीं । अकळु न कळेचि तो हा अमुर्त मूर्ती । पुंडलिकाचे भक्ती य़ेऊनियां वाळवंटीं । उभा राहे विटेवरी कर ठेऊनि कटीं

avyakta parabrahma kaisen alen vo vyaktin | akalu na kalechi to ha amurta murti | pundalikache bhakti य़euniyan valavantin | ubha rahe vitevari kar theuni katin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अव्यक्त परब्रह्मा कैसें आलें वो व्यक्तीं । अकळु न कळेचि तो हा अमुर्त मूर्ती । पुंडलिकाचे भक्ती य़ेऊनियां वाळवंटीं । उभा राहे विटेवरी कर ठेऊनि कटीं ॥१॥ जिवाचा जिवनु वो मज भेटवा हरी । लागलें प्रेम पिसें होऊनि दासी कामारी ॥ध्रु०॥ कसे कसिला पितांबर तयावरी मेखळा । अंगीं उटी चंदनाची शोभती वनमाळा । बाहू बाहुवटे तें रूप खुंतलें डोळां । मन माझें मोहिलें द्दष्टि देखतां घननिळा ॥२॥ अधर जें पोंवळियाचे दंत हिर्‍याची जोती । विशाल नयन वो भोंवया व्यंकटा अति । टिळक जो रेखिला मृगनाभीं लल्लाटीं । उपमा नये व्यक्ती चंद्रा पडियली तुटी ॥३॥ माथां मुगुट जो रत्नें जडियली वरी । त्याखालीं मयूपरत्रीं वेटी साजे मुरारी । माथां त्या विरगुंठी पुष्पें तुरंबिलीं वरी । तेणें मी भाळलियें भेटवावो झडकरी ॥४॥ इंद्ननीळ कीळ उभा घना श्यामु हा दिसे । पाहा तूं एक द्दष्टीं चकित केलें वो हांसे । तेचि ते कामबाण जिवा लागलें पिसें । नामया विष्णुदासा व्यापिलें ह्रषीकेशें ॥५॥