भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या विद्येचा करूनी अभ्यास । पावलों मी क्लेश देवराया

avaghya vidyecha karuni abhyas | pavalon mi klesh devaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघ्या विद्येचा करूनी अभ्यास । पावलों मी क्लेश देवराया ॥१॥ मुक्ताबाई योगें उतरलों भवसिंधु । तैशी दीनबंधु कृपा करी ॥२॥ पतितपावन नाम तुझें थोर । करीं अंगिकार अनाथाचा ॥३॥ धन्य आमुचें भाग्य जाहलें दर्शन । अंगें नारायण साहित्य करी ॥४॥ चांगदेवें ऐसें आठविलें फार । केला नमस्कार नामा म्हणे ॥५॥