भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघी जयजयकारेम पिटियेली टाळी । उठली मंडळी वैष्णवांची

avaghi jayajayakarem pitiyeli tali | uthali mandali vaishnavanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघी जयजयकारेम पिटियेली टाळी । उठली मंडळी वैष्णवांची ॥१॥ सह मंडळी सारे उठले ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीशी ॥२॥ पंचद्वारे संत रिघाले बाहेर । सखा ज्ञानेश्वर आळंकापुरीं ॥३॥ इंद्रायणी केलें अवघ्यांही आचमन । करिती समाधान निवृत्तीचें ॥४॥ सोपानासी पोटीं धरिलें देवानें । संवत्सरगांवी जाणें नेम केला ॥५॥ मुक्ताबाईलागीं सांगितली खूण । जाय तो सोपान स्थिर असा ॥६॥ त्रिवर्ग तीं ऐसीं राहिलीं एकमनें । जाणोनियां खूण नामा म्हणे ॥७॥