भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघी हे पंढरी सुखाची मांदुस । माझा स्वप्रकाश रत्न हरी

avaghi he pandhari sukhachi mandus | majha svaprakash ratna hari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघी हे पंढरी सुखाची मांदुस । माझा स्वप्रकाश रत्न हरी ॥१॥ धन्य संतजन तेथिंचे पारखी । ज्यां झाली ओळखी विठठल-नामीं ॥२॥ अनुभवुनीं चित्तीं पाहिलें विवेकें । धरिलें पुंडलीकें ह्लदयकमळीं ॥३॥ त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण । करोनि भूषण भोगितसें ॥४॥ युगें गेलीं परीं पालटचि नाहीं । नित्य शुद्ध तेज:पुंज ॥५॥ पाहतां नित्य नवें ध्यातां चित्त निवे ।ह्मणोनि नामा जिवें विसंबेना ॥६॥