भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघी चित्तवृत्ति एकवटोनि जेणें । अवघा धरिला मनें पांडुरंग

avaghi chittavrutti ekavatoni jenen | avagha dharila manen pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघी चित्तवृत्ति एकवटोनि जेणें । अवघा धरिला मनें पांडुरंग ॥१॥ अवघें सुख एक तयासि फावलें । अवघें सफळ झालेम जन्म त्याचें ॥२॥ अवघीं व्रतेम दानेम केलीं पैं तयानें । ज्याचें विठ्ठलीं ध्यान मन जडलें ॥३॥ नित्य विठ्ठल नाम गर्जती सप्रेमें । अवघे नित्य नेम झाले त्यांचे ॥४॥ अवघा इष्ट मित्र बंधु माता-पिता । केला आवडता पांडुरंग ॥५॥ नामा म्हणे ऐसे अवघे सं-प्रदाय । मिळोनि धरा पाय विठोबाचे ॥६॥