भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे सावधान होऊनि विचारा । सोडवण करा संसाराची

avaghe savadhan houni vichara | sodavan kara sansarachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघे सावधान होऊनि विचारा । सोडवण करा संसाराची ॥१॥ अवघा काळ वाचे ह्मणा नारायण वांयां एक क्षण जाऊं नेदी ॥२॥ अवघें हें आयुष्य सरोनि जाईल । मग कोण होईल साह्य तुह्मां ॥३॥ अवघा प्रपंच जाणोनि लटिका । शरण रिघा एका पंढरिराया ॥४॥ अवघे मायामोह गुंतलेति पहा । अवघे स-हज आहां जीवन्मुक्त ॥५॥ नामा म्हणे अवघे सुखाचेचि व्हाल । जरी मन ठेवाल विठ्ठलापायीं ॥६॥