भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघाचि संसार करीन सुखाचा । जरी जाला दुःखाचा दुर्धर हा

avaghachi sansar karin sukhacha | jari jala duhkhacha durdhar ha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघाचि संसार करीन सुखाचा । जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ॥१॥ विठोबाचें नाम गाईन मनोभावें । चित्त तेणें नांवें सुख पावे ॥२॥ इंद्रियांचें कोड सर्वस्वें पुरती । मनाचे मावळती मनोधर्म ॥३॥ श्रवणीं श्रवणा नामाचा प्रवंधा । नाइकें स्तुतिनिंदा दुर्जनाची ॥४॥ कुंडलें मंडित श्रीमुख निर्मळ । पाहतां हे डोळे निवती माझे ॥५॥ विटेसहित चरण धरीन मस्तकीं । तेणें तनु सुखी होईल माझी ॥६॥ संतसमागमें नाचेन रंगणीं । तेणें होईल धुणी त्रिविध तापा ॥७॥ नामा म्हणे सर्व सुखाचा सोईरा । न विसंवे दातारा क्षणभरी ॥८॥