भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां आहे नाहीं पाहतां क्षण एक । संपत्तीचे सुख विषय हा

atan ahe nahin pahatan kshan ek | sampattiche sukh vishay ha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां आहे नाहीं पाहतां क्षण एक । संपत्तीचे सुख विषय हा ॥१॥ हित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ॥२॥ संपत्तीच्या बळें एक जाले आंधळे । वेढिलें कळिकाळें स्मरण नाहीं ॥३॥ एक विद्यावंत जातीच्या जातीच्या अभिमानें । नेले तमोगुणें रसातळा ॥४॥ मिथ्या माया करोनि मोह हव्यास । वेचिलें आयुष्य वायांविण ॥५॥ नामा म्हणे कृपा करुनि ऐशा जीवा । सोडवी केशवा मायबापा ॥६॥