भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज

asoni na dise laukik vevharin | aisa tun antarin lapavin maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥१॥ परि तुझे पायीं माझें अनुसंधान । वरी प्रेमाजीवन देई देवा ॥२॥ मनाचिया वृत्ति आड तूं राहोनि । झेंपावती झणीं कामक्रोध ॥३॥ नामा म्हणे ऐसें पाळिसी तूं मातें । मी जीवें तूतें न विसंवें ॥४॥