भजनी मालिका
← भजनांकडे परत

आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसें करूं

ashvasoni dev bolile dhruvasi | ichchha tujhi jaishi taisen karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसें करूं ॥१॥ सहज सत्येनें ऐसें कांहीं जहालें । अढळ दिधलें बैसावया ॥२॥ चंद्र सूर्य तारा शशि ऋषी भोर । हे ज्या आधारें हिंडताती ॥३॥ ब्रम्हलोक साचे परी ते न नासे । ऐशा परी त्यास बैसविले ॥४॥ क्षतेचा दिवस योजनें उन्नती । बेसवी श्रीपति ध्रुवालागीं ॥५॥ सवी सर्वत्नांच्या लोचना गोचर । रमणीये अपार वर्णवेना ॥६॥ नामा म्हणे दुजें वैकुंठ केवळ । भक्तालागीं केलें देवरायें ॥७॥